www.24taas.com, मुंबई
दादर-नायगाव परिसरातल्या स्प्रिंग मिलच्या जमिनीपैकी एकतृतीयांश जमीन मुंबई महापालिका आणि म्हाडाला हस्तांतरित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. त्यामुळे बॉम्बे डाईंगला मोठा दणका बसला आहे.
मुंबई शहर विकास नियमावली 1991 च्या 58 व्या कलमानुसार मिलच्या एकूण जमिनीपैकी एकतृतीयांश जमीन कामगारांच्या घरांसाठी म्हाडाकडे हस्तांतरित करणं बंधनकारक आहे. राज्य सरकारनं तसा आदेशही दिलाय.
मात्र तो धाब्यावर बसवून आधुनिकीकरणाच्या नावाखाली बॉम्बे डाइंगनं नायगाव, प्रभादेवी आणि लोअर परेल येथील तीन युनिटमध्ये बांधकामाला सुरूवात केली होती. बांधकाम रोखण्याची नोटीस पालिकेनं बॉम्बे डाइंगला बजावल्यानंतर बॉम्बे डाइंगनं कोर्टात धाव घेतली. त्यावर निकाल देतांना कोर्टानं बॉम्बे डाइंगला दणका दिला आहे.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="99608"]