माटुंग्याजवळ आज सकाळी ओव्हरहेड वायरचा खांब झुकल्याने मध्य रेल्वेची वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.
सकाळी ओव्हरहेड वायरचा खांब झुकल्याने मध्य रेल्वेची वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यातच रेल्वेचा रूळ उखडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. हा खोळंबा टाळण्यासाठी एक ऐवजी तीन क्रमांक फलाटावरून गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे एकवरून तीन क्रमांकाच्या फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली.
मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत घटनास्थळी रेल्वेचे कमर्चारी व अधिकारी दाखल झाले आहेत. लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असे अधिकाऱयांनी सांगितले होते. ही वाहतून सुरळीत करण्यात यश आले आहे. डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू झाली.
[jwplayer mediaid="21594"]