www.24taas.com, हेमंत बिर्जे, मुंबई
मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये पाणीपट्टीत 8 टक्क्यांनी वाढ झालीयं. या पाणीपट्टीच्या वाढीमुळे मुंबईकरांना झळ बसणार आहे.शिवसेना-भाजप युतीन पालिका निवडणूकीनंतर लादलेल्या वाढीव पाणीपट्टीला कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अपक्षा नगरसेवकांनी विरोध केला आहे.
मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये पाणीपट्टीत 8 टक्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं 1000 लिटरमागे झोपडपट्टीधारकांना पुर्वी सव्वा दोन रुपये मोजावे लागायचे आता ही रक्कम साडेतीन रुपये इतकी झालीय. गृहनिर्माण सोसायट्यांना आता हजार लिटर मागे 4 रुपये मोजावे लागणार आहेत.पाण्याचे दर वाढवून शिवसेना-भाजप युतीनं मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला. वाढीला सभागृहातच नाही तर कोर्टातही आव्हान देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीपट्टीच्या दरावरून विरोधक राजकारण करत असल्याची टिका महापौरांनी केलीयं. मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी 40 हजार कोटी खर्च केला जातोय.त्यामुळं पाण्याचा नवीन दर ठरवणे गरजेचं असल्याचा दावा प्रभूंनी केला आहे
पाणी दरवाढीनंतर आता बेस्ट तिकीट दर आणि वीज दरवाढीची शक्यता लक्षात विरोधक युतीची कोंडी करण्यासाठी सरसावलेत. महापालिकेत जेमतेम बहुमत असल्यानं युतीला सर्वांना विश्वासात घेऊन कारभार करावा लागणार आहे.