मुंबईत दोन दिवस पाणीकपात

मुंबई शहरात दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा होणार आहे. दि. ७ आणि ८ मे रोजी पाणी कपात करण्यात येणार आहे.

Updated: May 4, 2012, 11:42 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबई शहरात दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा होणार आहे. दि. ७ आणि ८ मे रोजी पाणी कपात करण्यात येणार आहे.

 

 

पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणाकरण्यासाठी इस्टर्न एक्स्प्रेसहायवेवरील ऐरोली जंक्शन तेकन्नमवार नगर विक्रोळीमार्गावर नव्याने बसविण्यातआलेल्या ३ हजार मिमीव्यासाच्या जलवाहिनीच्याजोडणीचे काम करण्यातयेणार आहे . त्यामुळे ७ मेरोजी सकाळी १०वाजल्यापासून ८ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यात ४० ते १००टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार आहे . या कामामुळे मुंबई आणि उपनगरातील पाणीपुरठा सुरळीत होण्यास मदत होईल.

 

 

मुंबईतील कोणत्या भागांना बसणार फटका?

एस विभाग : १०० टक्के कपात

नाहूर पूर्व , भांडूप पूर्व , कांजूरमार्ग पूर्व आणि विक्रोळी पूर्व

पूर्व उपनगरे : ४० टक्के कपात

एम पूर्व , एम पश्चिम , एन आणि टी विभाग

 

 

उर्वरित सर्व विभागांमध्ये : २० टक्के कपात

जलजोडणीद्वारे थेट पाणीपुरवठा होणाऱ्या तसेच वितरण जाळ्याच्या शेवटच्याटोकाला असलेल्या रहिवाशांच्या पाणीपुरवठ्यावर यापेक्षा जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत.