मुंबई पालिकेचे बजेट, पाणी, वीज महाग?

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Updated: Mar 20, 2012, 01:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महापौरांनी मात्र पाणी, रस्ते, आरोग्य, ब्रिमस्टोव्हॅड प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं सांगितल आहे.

 

मुंबई महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी सन २०१२-१३ साठी २२ हजार ५०० कोटींचे बजेट सादर करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प २१ हजार ९६ कोटी ५६ लाखाचा होता. २०१२-१३ चा अर्थसंकल्पात पाणीपट्टी, फायर टॅक्स,बेस्ट भाडेवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

त्यामुळं विरोधक आतापासूनच आक्रमक झाले. अर्थसंकल्पात पाणी,रस्ते,आरोग्य,ब्रिमस्टोव्हॅड प्रकल्पांना अधिक निधीची तरंतूद केली जाईल अशी माहिती  महापौरानी दिली आहे. पालिकेच्या २०११-१२ चा अर्थसंकल्पात पाणी पुरवठा - मलनिस्सारणासाठी २७८ कोटी ४७ लाख निधीची तरतूद केली गेली.

 

आरोग्यासाठी १ हजार ६७२ कोटी  ८५ लाख. तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी ५०० कोटी निधीची तरतूद केली गेली होती. या निधीमध्ये अधिक वाढ होणार असल्यामुळे महापालिकेचं २१ हजार कोटींच बजेट २२ हजार ५०० कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.