युवासेनेच्या लीला, जलेबीबाई अन् शीला

युवा सेनेची स्थापना करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आपल्या तिसऱ्या पिढीला राजकारणात गेल्याच वर्षी उतरविले. या युवासेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात बाळासाहेबांनी युवकांना भान ठेवा, वाचा आणि शहाणे व्हा असा सल्ला दिला. मात्र, त्यांचा नातू आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आदेशाची पायमल्ली करत वाचा पेक्षा नाचाला जास्त महत्त्व दिले.

Updated: Oct 18, 2011, 03:32 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

युवा सेनेची स्थापना करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आपल्या तिसऱ्या पिढीला राजकारणात गेल्याच वर्षी उतरविले. या युवासेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात बाळासाहेबांनी युवकांना भान ठेवा, वाचा आणि शहाणे व्हा असा सल्ला दिला. मात्र, त्यांचा नातू आदित्य ठाकरे यांनी  त्यांच्या आदेशाची पायमल्ली करत वाचा पेक्षा नाचाला जास्त महत्त्व दिले.  मराठी ललनांचा ठुमक्यांचा किळसवाणा कार्यक्रम आयोजीत करून शिवसेनेच्या संस्कृतीला काळीमा फासला.

 

गेल्याच वर्षी दसरा मेळाव्यात युवा सेनेची स्थापना करण्यात आली. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेले आज एक वर्ष पूर्ण झालं, त्यानिमित्तच युवासेनेने पषण्मुखानंद नाट्यगृहामध्ये वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात मराठी तारकांच्या लटक्या-झटक्यांचा खास बेत आखला होता.

 

[caption id="attachment_2636" align="alignleft" width="300" caption="युवासेनेचे 'नाचकाम'"][/caption]

युवासेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तरूणांच्या मनोरंजनासाठी गीत - संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र संस्कृती रक्षणाचा ठेका घेणाऱ्या शिवसेनेच्याच युथ विंगच्या या कार्यक्रमात शीला की जवानी आणि जलेबी बाई या गीतांच्या तालावर युवासेनेचे कार्यकर्ते डोलत होते. युवासेनेच्या कार्यक्रमातली ही गीतं पाहून अनेकांना धक्का बसला.

 

या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे युवासेनेला मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी युवकांना खूप चांगले उपदेश दिले. परंतु त्यांचाच विचारांना फाटा देऊन युवासेनेच्या या कार्यक्रमामध्ये हिंदी गाण्यावर मराठी तारकांनी आपल्या अदा दाखविल्या आणि युवासैनिक पण त्या तालावर बेधुंद होऊन थिरकले. त्यामुळेच शिवसेनेवर चौफेर टीका होत आहे.