राऊतांनी ‘फोन’ प्रकरणात पडू नये- भाजप

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या या खोचक टोलेबाजीनंतर भाजपनं राऊतांवर पलटवार केलाय. फोनच्या वादात राऊत यांनी पडू नये, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिलाय. शिवसेनाप्रमुखांबाबत पूर्ण आदर आहेच, मात्र गडकीरीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं त्यांनी म्हटलय.

Updated: Feb 24, 2012, 08:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या या खोचक टोलेबाजीनंतर भाजपनं राऊतांवर पलटवार केलाय. फोनच्या वादात राऊत यांनी पडू नये, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिलाय. शिवसेनाप्रमुखांबाबत पूर्ण आदर आहेच, मात्र गडकरीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं त्यांनी म्हटलय.

 

 

सेनाप्रमुखांना फोन केला तर त्यांच्या पर्यंत तो पोहचत नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट झी २४ तासचे बातमीदार अखिलेश हळवे यांच्याशी बोलताना नितीन गडकरींनी केला होता. गडकरींचे फोन बाळासाहेबांपर्यंत पोहत नाही, याचा माझाशी काय संबंध मला समजत नाही. मी काय मातोश्रीचा ऑपरेटर आहे की, काय असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर प्रत्युत्तर देताना जावडेकरांनी राऊतांनी सल्ला दिला आहे.

 

 

काय म्हटले राऊत

सामना’त काय लिहावे हे गडकरींनी आम्हांला सांगू नये, यासाठी बाळासाहेब आहेत.  सामना’मध्ये यापूर्वी अनेकवेळा गडकरी यांच्याबद्दल चांगले लिहून आले आहेत. सामनातील प्रत्येक शब्द तोलून मापून वापला जातो. ज्या ठिकाणी टीका करायची त्या ठिकाणी टीका होणारच, पण आम्ही कौतुकही करतो, असे प्रत्युत्तर ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत सामनातील लिखाणावर आक्षेप घेतला होता. सामनातील लिखाणामुळे युतीत कटूता निर्माण होत, असल्याची नाराजी गडकरी यांनी व्यक्त केली होती. त्यावर खुलासा देताना संजय राऊत यांनी गडकरींना प्रत्युत्तर दिले.

 

मी काय मातोश्रीचा ऑपरेटर नाही- राऊत

बाळासाहेबांना फोन केला तर त्यांच्यापर्यंत जाऊ दिला जात नाही, या गडकरींच्या यांच्या गोप्यस्फोटावर बोलताना, राऊत म्हणाले, की गडकरींचा रोष नेमका माझ्यावर आहे, की मातोश्रीवर आहे. हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांचे फोन बाळासाहेबांपर्यंत पोहत नाही, याचा माझाशी काय संबंध मला समजत नाही. मी काय मातोश्रीचा ऑपरेटर आहे की, काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

 

 

सामनात काय लिहून येतं याकडे सर्व देशाचं लक्ष असतं. शिवसेना आणि भाजपच्या प्रचाराचा जो झंझावात निर्माण होतो, त्याला काही अंशी सामना जबाबदार असतो.  गडकरींनीही हे माहीत आहे. त्यांची जी टीका ही गैरसमजातून झाली असावी. सामनातून नितीन गडकरी आणि इतर नेत्यांविषयी मला नाही वाटतं की काही चुकीचं लिहून आलं असेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

 

 

काय म्हटले गडकरी



भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावनेविषयी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सेनाप्रमुखांना फोन केला तर त्यांच्या पर्यंत तो पोहचत नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट झी २४ तासचे बातमीदार अखिलेश हळवे यांच्याशी बोलताना  नितीन गडकरींनी केला.

 

 

सामनाचे संपादक संजय राऊत हे सातत्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, गोपीनाथ मुंडे, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि माझ्याबद्दल सातत्याने टीका करतात. तसंच लिखाणाचा स्तरही चांगला नसतो. भविष्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील संबंध चांगले राहावेत असं वाटत असल्यास संजय राऊत यांनी याचा विचार करावा.

 

 

सामनातील लिखाणामुळे युतीत कटुता निर्माण झाली असल्याची टीका गडकरींनी केली आहे. राऊतांनी असले लिखाण करुन संबंध बिघडवू नयेत असं गडकरी म्हणाले. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल अटलबिहारी वाजपेयीं इतकाच आदर माझ्या मनात असल्याचं

Tags: