www.24taas.com, मुंबई
'मनसेचं कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्याची १५ दिवस पाहणी करतील.. गाड्यांची मोजणी करतील' असं राज ठाकरे यांनी वक्तव्य करताच राज्यातल्या सर्व टोलनाक्यांवर मनसेचा टोलवॉच आजपासून सुरू झाला आहे.
मनसेचे कार्यकर्ते टोलनाक्यांवर वाहनांची मोजणी करत आहेत. पंधरा दिवसानंतर या आकडेवारीतून नागरिकांची कशी लूट सुरू आहे, याची माहिती दिली जाणार आहे. टोलचे कंत्राटदार रस्त्याच्या बांधणीचा खर्च वसूल झाल्यानंतरही अवैधपणे वसुली करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
तर टोलवसुली शिवाय राज्याचा विकास होणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता आंदोलनाची दिशा बदलली आहे. मात्र यापुढे नक्की काय करणार याकडेच साऱ्या महाराष्ट्रचं लक्ष लागून राहिलं आहे.