www.24taas.com, मुंबई
राज्यभरातील रिक्षा चालकांनी १५ एप्रिलनंतर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा संघटनांच्या कृती समितीची आज पुण्यात बैठक झाली. त्यात राज्य सरकारकडं १८ मागण्या मांडण्यात आल्या.
इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती नको, ही त्यातली प्रमुख मागणी आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे साडेसात लाख रिक्षाचालक बेमुदत बंद पुकारणार आहेत. तसा ठराव आजच्या बैठकीत संमत कऱण्यात आला. यावेळी कामगार नेते शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
मुंबईत १६ एप्रिलपासून रिक्षा युनियनने बेमुदत संपाचा इशारा दिला होता. भाडेवाढीची मागणी मान्य न झाल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल असं युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी म्हटलं होतं. रिक्षाचे किमान भाडे १७ ते २० रुपयांदरम्यान असावं अशी युनियनची मागणी आहे.