लोकपाल प्रश्नी, सरकार अपयशी -पवार

लोकपाल विधयेकामुळे गेल्या काही दिवसांपासून जी गोंधळाची परिस्थिती आहे, ती सरकारने टोस भूमिका न घेतल्यामुळे झाली, असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले.

Updated: Dec 30, 2011, 06:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

लोकपाल विधयेकामुळे गेल्या काही दिवसांपासून जी गोंधळाची परिस्थिती आहे, ती सरकारने टोस भूमिका न घेतल्यामुळे झाली, असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले.

 

झी २४ तासच्या गेस्ट एडिटर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संपादकीय बैठकीत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. सरकार सुरूवातीपासूनच अण्णांनी आणि सिव्हिल सोसायटी यांच्या दबावाला बळी पडले आणि त्याची परिणीती या अंधातरी परिस्थितीत झाली.

 

मुळात लोकपाल विधेयक हे कोणासाठी हवे हा मुद्दा समजून घ्यायला हवा होता. या बिलात केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा, अशी अण्णांची भूमिका होती. ती मुळात परिस्थितीला धरून नव्हती. जे शक्यच नाही त्याचा हट्ट अण्णांनी धरला, हा हट्ट धरल्यावर सरकार त्या बळी पडले, परंतु, संसदेत विधेयक मांडताना परिस्थिती वेगळी होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.  

या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यात सर्वांनी संसदेचे सर्वोच्च स्थान आबादीत राहावं यासाठी आग्रह धरला होता. तसेच राज्याचा कायदा राज्याने करावा, त्यात केंद्रान हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली होती. परंतु, एकूण आंदोलन आणि इतर परिस्थिती पाहता सरकारने हा प्रश्न योग्य प्रकारे हातळला नाही.

Tags: