लोकल ट्रेनच्या प्रवासात गमावला डोळा

मुंबईतला रेल्वे प्रवास हा नेहमीच धोक्याचा मानला जातो. लोकल प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अशीच काही घटना मुबंईत घडली आहे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला आपला डोळा गमवाला लागला.

Updated: Nov 8, 2011, 02:44 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईतला रेल्वे प्रवास हा नेहमीच धोक्याचा मानला जातो. लोकल प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अशीच काही घटना मुबंईत घडली आहे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला आपला डोळा गमवाला लागला. ठाण्यातल्या केसर मिल परिसरात राहणारी महिला ठाणे ते विक्रोळीदरम्यान प्रवास करत असताना बाहेरून दगड मारल्यामुळं ठाण्यातल्या केसर मिल परिसरातल्या महिलेला डोळा गमवावा लागला.

 

गेल्या चार महिन्यात बाहेरून दगड मारण्याची ही पाचवी वेळ आहे. रेल्वे पोलिसांनी याची आतातरी दखल घ्यावी अशी मागणी जखमी दर्शना खानपेकर या महिलेलनं केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर रेल्वे रुळाच्या जवळ राहणाऱ्या लोकांची मिटींग घेऊन त्यांच्यात जनजागृती करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले आहे त्यामुळे अनेक प्रवासी या साऱ्या प्रकाराला बळी पडत आहे. आणि त्यामुळे मुंबईत प्रवास करणारे लोक या साऱ्या प्रकाराने नक्कीच धास्तावले आहेत.