विकासाची प्रगती खालवली, शेअर कोसळले

भारताची प्रगती खालवली असल्याची माहिती स्टँडर्ड आणि पूअर्स अर्थात एस अँड पीच्या सर्वेक्षणात समोर आली. ही बाब थेट शेअर मार्केटवर परिणाम करून गेली. नकारात्मक निष्कर्षामुळे शेअर बाजार कोसळला.

Updated: Apr 25, 2012, 03:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

भारताची प्रगती खालवली असल्याची माहिती स्टँडर्ड आणि पूअर्स अर्थात एस अँड पीच्या सर्वेक्षणात समोर आली. ही बाब थेट शेअर मार्केटवर परिणाम करून गेली. नकारात्मक  निष्कर्षामुळे शेअर बाजार कोसळला.

भारताचा विकासाबाबातचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याचा निष्कर्षही एस अँड पीनं नोंदवलाय. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात होऊन शेअर बाजार १११ अंकांनी घसरला. त्यानंतर बाजार पुन्हा सावरला.

विकासाबाबत भारताचा दृष्टीकोन नकारात्मक असल्यानं विकास दर 5.3 टक्क्यांवर येवू शकतो, असं या सर्वेक्षणात म्हंटलय. भारताचं रेटींग नकारात्मक असलं तरी ते स्थिर असल्याचं एस एण्ड पी नं म्हटलंय..भारताची राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याचं यात नमूद केले गेले आहे.