झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या विकिपिडियाच्या कॉन्फरेंसमध्ये भाजयुमोचे जोरदार आंदोलन, विकिपिडियाच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्यात आला आहे. भारताच्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश हा भाग चीनमध्ये दाखविण्यात आला आहे.
यासाठीच तीन दिवस चालणाऱ्या या विकिपिडियाच्या कॉन्फरन्सला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, जोरदार घोषणाबाजीने विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला, तसेच या कार्यकर्त्यांनी विकिपिडियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केलेली राडेबाजी आणि घोषणाबाजी यामुळे पोलिसांना या आंदोलनाला आवरण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. काही विकिपिडियाच्या या कॉन्फरन्सचा आज पहिलाच दिवस भाजयुमोने चांगलाच गाजवला.