रितेश - जेनेलिया लवकरच लग्नाच्या बेडीत

हिंदी चित्रपट अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्‍यता आहे.

Updated: Nov 17, 2011, 08:29 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

हिंदी चित्रपट अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्‍यता आहे. त्यांनी लग्नाचा मुहूर्तही काढला आहे. ४ फेब्रुवारी २०१२ रोजीचा मुहूर्त असणार आहे.

 

त्यांचा विवाह मुंबईतील हयात रेसिडन्सीमध्ये  होणार असून त्यासाठी तीन दिवस हॉटेल बुक केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाचा समारंभ अतिशय गुप्तपणे असणार आहे.

 

दोघांकडून काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनाच लग्नाला आमंत्रित करण्यात येणार आहेत. यामध्ये जेनेलियाकडून राणा डुग्गुबाती, बच्चन कुटुंबीय, रामगोपाल वर्मा, इम्रान खान; तर रितेशकडून करण जोहर, बोमन इराणी आणि साजिद खान यांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.

 

रितेश आणि जेनेलिया यांचा २००३ मध्ये  'तुझे मेरी कसम' हा चित्रपट झळकला होता. तेव्हापासून त्यांचे अफेअरची चर्चा  होती.  काही महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपुडाही केल्याची जोरदार चर्चा होती. तेव्हा त्यांनी यालाही होकार दिला नव्हता; मात्र आता हे दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

फेब्रुवारीमध्येच या दोघांचा 'तेरे नाल इश्‍क हो गया' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. असेअसले तरी  या लग्नाला कोणाकोणाला बोलवायचे याची यादी करण्यासही सुरुवात झाली असल्याचे समजते.