वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने मृत्यू !

ठाण्यातल्या आशा सिंह यांना दोन वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केलाय. याबाबत सायन हॉस्पिटल प्रशासानानं बोलायला नकार दिलाय.

Updated: Nov 24, 2011, 07:52 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

ठाण्यातल्या आशा सिंह यांना दोन वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केलाय. याबाबत सायन हॉस्पिटल प्रशासानानं बोलायला नकार दिलाय.दोन वेगवेगळ्या ग्रुपचं रक्त दिल्यानं ठाण्याच्या आशा सिंह यांना जीव गमवावा लागलाय. सायन हॉस्पिटलमध्ये 29 जुलैला आशा सिंह यांना बी पॉझिटीव्ह रक्त देण्यात आलय. त्यानंतर आठ ऑक्टोबरला ए पॉझिटीव्ह रक्त देण्यात आलं. रक्त दिल्यावर त्यांचं 24 तासांतच निधन झालं. चुकीच्या गुपचं रक्त दिल्यानं ही घटना घडल्याचं त्यांच्या पतीचा आरोप आहे.

 

 

आशा सिंह यांना पित्ताशयाचा कॅन्सर झाला होता. हॉस्पिटलनं दिलेल्या डेथ सर्टीफिकेटमध्ये त्यांच्या मृत्यूचं कारण कॅन्सर असल्याचं स्पष्ट करण्यात आलय. याबाबत प्रशासनानं काहीही बोलण्यास नकार दिलाय. आशा सिंह यांच्या पतीनं माहितीच्या अधिकारात त्यांना दिलेल्या रक्ताचा सर्व तपशील मागवलाय.