हल्ल्यानंतर केंद्राने तुणतुणे वाजवू नये- आबा

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडलंय. विधिमंडळात नक्षलवादावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं.

Updated: Mar 29, 2012, 05:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडलंय. विधिमंडळात नक्षलवादावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं. केंद्र सरकार घटना घडेपर्यंत बोलत नाही. मात्र घटना घडल्यानंतर आम्ही माहिती दिल्याचं सांगते. केंद्र सरकारने हे तुणतुणे वाजवणं बंद करावे,  अशीही टीका त्यांनी केली.

 

२७ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी  केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १२ जवान ठार  झाले होते तर २३ जण जखमी झाले होते. सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

 

भूसुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलातील  पंधरा जवानांचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांनी गाडी भूसुरुंगाच्या साहाय्याने उडवून दिली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी रवाना झाले. या संदर्भात विरोधी पक्षाने विधीमंडळात चौकशीची मागणी करून विधीमंडळ दणाणून सोडले होते.