१.८५ पैशांनी पेट्रोल स्वस्त

पेट्रोलचे दर अखेर १.८० पैशांनी कमी झालेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत.

Updated: Nov 16, 2011, 03:20 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

पेट्रोलचे दर अखेर १.८५ पैशांनी कमी झालेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत. मुंबईकरांना प्रत्यक्षात २.३४ पैशांनी दिलासा मिळणार आहे.

 

गेल्या ३३ महिन्यांत पहिल्यांदाच पेट्रोलची किंमत घटलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कपात केलीय.
टॅक्समध्येही मिळणारा फायदा पाहता मुंबईत पेट्रोल ७३ रुपये ८०पैशांऐवजी आता ७१ रुपये ४७पैशांना मिळेल. पुण्यात ७४ रुपये ११ पैशांवरून ७२ रुपये २६ पैशांना मिळेल. ठाण्यात ७६ रुपये ७६पैशांवरून ७४ रुपये ९१ पैसे नवा दर असेल. नाशिकमध्ये ७३ रुपये ८४पैशांवरून दर ७१.९९ रुपये असेल.