चालत्या रेल्वेत तरुणीचा विनयभंग, आरोपी सीसीटीव्हीत कैद

मुंबईला लाजवणारी आणखी एक घटना पश्चिम रेल्वेमार्गावर घडल्याचं उघडकीस आलंय.

Updated: Feb 23, 2016, 02:01 PM IST
चालत्या रेल्वेत तरुणीचा विनयभंग, आरोपी सीसीटीव्हीत कैद title=

मुंबई : मुंबईला लाजवणारी आणखी एक घटना पश्चिम रेल्वेमार्गावर घडल्याचं उघडकीस आलंय.

सोमवारी, एका १८ वर्षीय मुलीनं  सकाळी ६.१४ वाजता चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी रेल्वे पकडली होती. लेडीज डब्यातून प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास हा डब्बा रिकामा होता.

याचाच फायदा घेत एका अज्ञात इसमान डब्यात प्रवेश केला आणि आपला विनयभंग केला, अशी तक्रार या मुलीनं केलीय. 

ही मुलगी रिकाम्या ट्रेनमध्ये गाणं ऐकत प्रवास करत असतानाच हा प्रकार घडल्यानं ती क्षणभर हादरली... पण, तीनं आरडा-ओरड केल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीनं वानखेडे स्टेडियमजवळ चालत्या रेल्वेतून खाली उडी मारली. 

यानंतर, मरिनलाईन्सला उतरून पुन्हा चर्चगेटला येत या मुलीनं या घटनेची तक्रार दाखल केलीय. या घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हा तपासलेत. त्यांना या फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आलीय. पुढचा तपास सुरू आहे, अशी माहिती जीआरपीचे पीआरओ रितेश अहिर यांनी दिलीय.