२०% ठेकेदारांचा निष्काळजीपणा, मनपाची कबुली

रस्त्यांच्या कामांमध्ये 20 टक्के ठेकेदारांनी निष्काळजीपणा दाखविल्याची कबुली मुंबई महापालिका प्रशासनानं दिलीय. या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व ठेकदार तसंच रस्ते विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 27, 2013, 09:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रस्त्यांच्या कामांमध्ये 20 टक्के ठेकेदारांनी निष्काळजीपणा दाखविल्याची कबुली मुंबई महापालिका प्रशासनानं दिलीय. या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व ठेकदार तसंच रस्ते विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत रविवारी मध्यरात्रीपर्यंत खड्डे बुजवण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्यात.
मुंबईतल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे महापालिकेची अब्रू वेशीवर टांगली गेलीय... खड्यांची समस्या आता फक्त वाहतूक कोंडीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती आता मुंबईकरांच्या जीवावरही बेतू लागलीय... खड्यांमुळे महापालिकेविरुद्ध लोकांमध्ये कमालीचा संताप निर्माण झालाय...पावसाळी अधिवेशनात रस्त्यांवरील खड्यांचे पडसाद उमटल्यांनतर आत्ता कुठे प्रशासन जागं झालंय खरं... शनिवारी आयुक्त सीताराम कुंटे यांनी तातडीनं रस्त्यांची कामे दिलेले सर्व ठेकेदार, रस्ते विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली... युद्धपातळीवर कामं हाती घेऊन रविवारी मध्यरात्रीपर्यंत सर्व खड्डे बुजवा अशा सूचना त्यांनी ठेकेदारांना केल्यात... सोमवारी सकाळी मुंबईकरांची रस्त्यांची समस्या सुटलेली दिसली पाहिजे यासाठी आयुक्त कामाला लागलेत...
रस्त्यांची कामं घेणा-या 20 टक्के ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्याचं महापालिका प्रशासनाला आढळून आलं आहे... निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याबद्दल ठेकेदारांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे...
रस्त्यांची कामं मंजूर करतानाच प्रशासनानं कठोर पावलं उचलली असती तर महापालिकेवर ही नामुष्की ओढवली नसती... त्यातच कंत्राटांमधली टक्केवारी वाढल्यामुळेच रस्त्यांचा दर्जा अधिक खालावल्याची कुजबूज सुरू झालीये... या प्रकारांना आळा घालून रस्ते-पुलांचं कंत्राट देताना प्रशासन पुरेशी खबरदारी घेतली जाईल, अशी आशा करूयात...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.