मुंबई : परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाडा इथल्या ‘एसईएस कॉलेज ऑफ हॉटेल एण्ड टुरिझम मॅनेजमेंट’चे हे विद्यार्थी चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशियाला दाखल झाले होते. सुरुवातीला तीन महिने हाऊस किपिंगचे काम नंतर नोकरी असा त्यांचा करार झाला होता. मात्र, त्यांना गेल्या 10 महिन्यांपासून सफाई कामगारांसारखं वागवलं जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलीय.
तसंच ज्या कंपनीच्या मार्फत हे सर्व विद्यार्थी मलेशियात गेले आहेत, ती कंपनीही मलेशिया सरकारनं यापूर्वीच ‘ब्लॅक लिस्ट’ केल्याचं स्पष्ट झालंय. यापैंकी तीन तरुणींचा व्हिसाही बोगस असल्याची माहिती समोर आलीय.
अडचणीत सापडलेल्या या तरुणांपैंकी तीन तरुणींनी मलेशियातल्या महाराष्ट्र मंडळाशी संपर्क साधला असून त्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र मंडळ प्रयत्न करतंय, अशी माहिती क्वालालंपूरच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष पंकज हेडाव यांनी दिलीय. तसंच या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असल्याचं कॉलेज प्रशासनानं सांगितलं. मात्र या प्रकरणी ‘झी मीडिया’ला ऑन कॅमेरा काहीही बोलण्यास कॉलेज प्रशासनानं नकार दिलाय.
भाजप नेते मधु चव्हाण यांनी या तरुणांना मदतीचं आश्वासन दिलंय... ‘झी 24 तास’नं तक्रारकर्त्यांपैंकी एक तरुणी पूजा सूर्यवंशी आणि मधु चव्हाण यांची बातचीत घडवून आणली... यावेळी, चव्हाण यांनी हे आश्वासन दिलंय... पाहुयात, यावेळी काय बोलणं झालं या दोघांमध्ये...
व्हिडिओ पाहण्यासाठी -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.