मुंबई : मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा पर्दाफाश झालाय.
कांदिवलीतल्या उच्चभ्रू अशा ठाकुर कॉम्प्लेक्समध्ये एका बंगल्यात अल्पवयीन मुलांचं शोषण केलं जात होतं. या बंगल्यातून २८ मुलांची सुटका करण्यात आलीय. यापैंकी १२ मुलं अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. शुक्रवारी रात्री ९ वाजता पोलिसांनी छापा मारून या मुलांची सुटका केलीय.
Mumbai: 28 people (12 minors) rescued by Mumbai Police from fake Godman, police stated children were being exploited pic.twitter.com/xvawpnEPFC
— ANI (@ANI_news) June 11, 2016
या बंगल्यात मुलांना दिवसरात्र पूजा-अर्चा जप-जाप्य करण्यास बळजबरी केली जायची. बंगल्यातली इतरही कामं करायला सांगितली जायची. काम न ऐकल्यास या मुलांना उपाशी ठेवलं जायचं.
हा बंगला बाहेरून पूर्णत हिरव्या कापडानं झाकलेला होता. या बंगल्यातून सतत पूजाअर्चेचे आवाज येत असायचे. एका मुलानं पालकांना केलेल्या एसएमएसनं हा सर्व प्रकार उघड झालाय. या प्रकरणातल्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केलीय.