काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

 काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र, नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचे दुसऱ्याही यादीत नाव नाही.

Updated: Sep 27, 2014, 08:21 AM IST

मुंबई : काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र, नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचे दुसऱ्याही यादीत नाव नाही.

उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसनं जाहीर केली असून या यादीतही नितेश राणेंचं नाव नाही. तसेच वरोऱ्यातून संजय देवतळेंचाही पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या ऐवजी आसावरी देवतळेंना उमेदवारी देण्यात आलीय. तसेच बडनेऱ्याहून सुलभा खोडकेंना उमेदवारी देण्यात आलीये.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.