मुंबई : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊसाची नोंद झाली. धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्व जिल्हात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, वाशिम हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदीया, ठाणे, रायगड, जळगाव, कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पाऊस झालाय. तर मुंबई उपनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय.
सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या दोन तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्र्टात काही भागात मुसळधार पाऊस सुरू होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळान् वर्तवला आहे.