मुंबई विमानतळावर 67 आयफोन आणि 57 मोबाईल जप्त

Updated: Dec 3, 2016, 07:57 PM IST
मुंबई विमानतळावर 67 आयफोन आणि 57 मोबाईल जप्त title=

मुंबई: मुंबई विमानतळावर शुक्रवारी रात्री एका व्यक्तीस 67 नवे आयफोन आणि 57 जुन्या मोबाईलसह अटक करण्यात आली आहे.

67 आयफोन आणि 57 जुने मोबाईलसह मोहम्मद युनुसमिया हा भारतीय नागरिक शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर आल्यानंतर विमानतळ कस्टम विभागाच्या तपासणी दरम्यान ही कारवाई आली आहे.

आरोपी मोहम्मदने सर्व फोन एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मोठ्या बॅगेत लपवले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व फोनची किंमत 43 लाख 18 हजार रूपये आहे.

आरोपी मोहम्मद दक्षिण आफ्रिकेहून एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ET610 ने मुंबईत आला. कस्टम विभागाच्या तपासणी दरम्यान त्याच्याकडचे सर्व फोन जप्त केलेत. तसेच विमानतळावर त्याला घेण्यासाठी आलेल्या एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे.