हार्बर मार्गावर 72 तासांचा जम्बोब्लॉक

 हार्बर मार्गावर 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Updated: Feb 18, 2016, 10:15 AM IST
हार्बर मार्गावर 72 तासांचा जम्बोब्लॉक title=

मुंबई: हार्बर मार्गावर 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 12 डब्यांची लोकल आणि इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

दरम्यान वडाळा-पनवेलमध्ये आठ मिनीटांच्या अंतरान, वडाळा-बेलापूर आणि वाशीसाठी अर्ध्या तासानं तर वडाळा-वांद्रे दरम्यान 16 मिनीटांनी लोकल चालवण्यात येणार आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

 19 फेब्रुवारीला रात्री 1.30 वाजता या कामाला सुरुवात होणार आहे. रविवारी 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर हे काम संपेल.

या जम्बो ब्लॉकवेळी प्लॅटफॉर्मचा विस्तार, सिग्नल यंत्रणेचं आधुनिकीकरण ही काम करण्यात येणार आहेत. या जम्बो ब्लॉकमुळे शनिवार आणि रविवारी सीएसटी ते वडाळ्यापर्यंत लोकल धावणार नाही. रविवारी मध्यरात्री हे काम पूर्ण होईल, त्यानंतर सोमवारी पहाटेपासून हार्बरची वाहतूक सुरु होईल. 

19 फेब्रुवारीचं वेळापत्रक

पहिली सीएसटी-पनवेल लोकल पहाटे 5 वाजून 8 मिनीट 

पहिली सीएसटी- वांद्रे लोकल पहाटे 5 वाजून 4 मिनीट

पहिली बेलापूर-सीएसटी लोकल पहाटे 4 वाजून 1 मिनीट

पहिली वांद्रे-सीएसटी लोकल पहाटे 4.30 वाजता

शेवटची पनवेल-सीएसटी लोकल रात्री 11 वाजून 20 मिनीट 

शेवटची सीएसटी-वांद्रे लोकल मध्यरात्री 12 वाजून 41 मिनीट

शेवटची अंधेरी-सीएसटी लोकल रात्री 11 वाजून 26 मिनीट