परीक्षा, ट्यूशन फी, डीडी, पे ऑर्डर, चेकने स्वीकारा-सीएम

कॉलेज विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सध्या नोटांचा गोंधळ सुरू असल्यानं रोखीनं फी भरता येत नाही. 

Updated: Nov 14, 2016, 06:47 PM IST
परीक्षा, ट्यूशन फी, डीडी, पे ऑर्डर, चेकने स्वीकारा-सीएम title=

मुंबई : कॉलेज विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सध्या नोटांचा गोंधळ सुरू असल्यानं रोखीनं फी भरता येत नाही. 

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विद्यापीठांना तशा सूचना देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिक्षण खात्याला दिलेत. डीडी, पे ऑर्डरऐवजी धनादेशाद्वारे शुल्क स्वीकारा, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.