जपून..जपून..जपून जारे...पुढे धोका आहे!

शून्य रूपये खर्च करून तुम्ही एक अॅक्सिडेंट प्रुफ स्पिडो मीटर बनवू शकता.

Updated: Feb 29, 2016, 05:59 PM IST
जपून..जपून..जपून जारे...पुढे धोका आहे! title=

मुंबई : शून्य रूपये खर्च करून तुम्ही एक अॅक्सिडेंट प्रुफ स्पिडो मीटर बनवू शकता, यामुळे तुमचा कधीही अपघात होणार नाही आणि समोरच्या वाहन चालकानेही असं स्पिडो मीटर लावलं, तर त्याचाही अपघात होणार नाही, याची हमी देता येईल.

मोटारसायकल चालवतांना तरूणांचं अपघात होण्याचं प्रमाण फार मोठं आहे.

तुमच्या बाईकच्या अथवा स्पिड मीटरमधील ८० किमी प्रति तासच्या पुढे तुमच्या प्रियजनांचे अथवा, चिमुकल्याचा फोटो लावा, कारण तुम्ही अपघातात गेलात, तर सर्वात मोठं नुकसान त्यांचंच होणार आहे, ज्यांना आपण गाडी वेगात चालवताना विसरतो.

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर भोगावी लागते.

तुमच्या प्रियजनांना या यातना नको असतील, तर कृपया आपल्या मोटारसायकलीचा आणि गाडीचा वेग नेहमी नियंत्रणात ठेवा.