कन्हैय्या कुमारवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न

जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. रविवारी मुंबईहून पुण्याकडे रवाना होत असताना विमानात एका व्यक्तीने कन्हैय्या कुमारचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Apr 24, 2016, 12:19 PM IST
कन्हैय्या कुमारवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न title=

मुंबई : जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. रविवारी मुंबईहून पुण्याकडे रवाना होत असताना विमानात एका व्यक्तीने कन्हैय्या कुमारचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. 

कन्हैय्या कुमारने ट्विटरवरुन ही माहिती दिली. रिपोर्टनुसार, कन्हैय्या मुंबईतून पुण्याकडे जात होता. यावेळी विमानाचे उड्डाण होण्याआधी एका व्यक्तीने कन्हैय्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कन्हैय्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.