यासीन भटकळला सोडविण्यासाठी विमान अपहरणाची शक्यता?

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आलाय. विमान अपहरणाचा धोका असल्यानं कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

Updated: Aug 13, 2014, 04:52 PM IST
यासीन भटकळला सोडविण्यासाठी विमान अपहरणाची शक्यता? title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आलाय. विमान अपहरणाचा धोका असल्यानं कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी'ला मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी यासीन भटकळला सोडविण्यासाठी विमान अपहरणाचा प्रयत्न होऊ शकतो. मुंबई विमानतळाबरोबरच इतर छोटया विमानतळांचा दहशतवादी अपहरणासाठी उपयोग करु शकतात त्यामुळं सर्व ठिकाणी काळजी घेण्यात येतेय. 

त्यामुळं २० ऑगस्टपर्यंत मुंबई विमानतळावर व्हिजिटर्स गॅलरीत प्रवेश दिला जाणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.