मुंबई : शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेचं तिकीट पुन्हा दिलं जाणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
मुंबईत शिवसेना भवनात विद्यमान सर्वच्या सर्व 48 आमदारांची आज विभागीय बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांचं तिकीट कन्फर्म असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तसेच सर्व आमदारांनी विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पण लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने गाफिल राहू नका. तो एक फुगा होता, त्यावर विसंबून राहाल तर हवेत विराल, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेमुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना कामं करण्यास वेळ मिळणार आहे, याचा शिवसेनेला फायदा होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
शिवसेनेचे महाराष्ट्रात 48 आमदार आहेत. या सर्व आमदारांना विधानसभेच्या कामाला लागण्या आदेश देण्यात आले आहेत. तसंच भाजप वगळता बाजूच्या मतदारसंघात कोण उमेदवार असावा, हे सुद्धा सुचवण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.