नेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...

ओळख नसतानाही केंद्रीय आणि राज्यातील विविध नेत्यांसोबत फोटो काढून चमकोगिरी करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आलीय. या अनोळखी व्यक्तीचं नाव अनिल मिश्रा असल्याचं समजतंय.

Updated: Nov 7, 2014, 06:10 PM IST
नेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक... title=

मुंबई : ओळख नसतानाही केंद्रीय आणि राज्यातील विविध नेत्यांसोबत फोटो काढून चमकोगिरी करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आलीय. या अनोळखी व्यक्तीचं नाव अनिल मिश्रा असल्याचं समजतंय. त्याला ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय.


मिश्रा अमित शहा यांच्यासोबत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या शपथविधीवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याची तक्रार भाजप नेत्यांनी केली होती.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती स्टेजवर फिरत असल्याची तक्रार एका भाजप कार्यकर्त्यानं केलीय. सर्व सुरक्षा भेदून हा इसम स्टेजवर बिनधास्तपणे फिरताना दिसला होता.


मिश्रा उद्धव ठाकरे यांच्यासोबत

तो सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवती-भवती स्टेजवर फिरत होता... इतकंच नाही तर त्यानं अमित शहा, केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फोटो काढलेत. 

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये राहिलेल्या त्रुटींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली होती.


मिश्रा पंकजा मुंडे, रवीशंकर प्रसाद यांच्यासोबत

यावेळी स्टेजवर नवनिर्वाचित मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रीमंडळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे इतर वरीष्ठ नेते उपस्थित होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.