मुंबईकरांसाठी आणखी एक 'कूल नाईट'

राज्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय, नाशिकमध्ये तापमान ६ डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं आहे. याचा कडाका आता मुंबई शहरातही जाणवायला लागला आहे.

Updated: Dec 16, 2014, 07:17 PM IST
मुंबईकरांसाठी आणखी एक 'कूल नाईट' title=

मुंबई : राज्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय, नाशिकमध्ये तापमान ६ डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं आहे. याचा कडाका आता मुंबई शहरातही जाणवायला लागला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीची लाट चांगलीच पसरली आहे.  ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे, म्हणून मुंबईकरांना आणखी एक कूल नाईट मिळणार आहे.

रविवारी रात्री सांताक्रुझ येथील वेधशाळेच्या केंद्रात कमाल १२ अंश सेल्सिलयस तापमानाची नोंद झाली तर कुलाबा येथे १६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.  

या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी रात्री झाली.

सांताक्रुझ येथे कमाल तापमान १८.७ अंश सेल्सियसपर्यंत घसरेल अशी अपेक्षा होती मात्र पारा आणखीनच घसरल्याने रविवारी कडाक्याच्या थंडीने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली.

तापमानातील वाढ, गारवा, गारपीट यामुळे राज्यभरात तापमानात घट नोंदवली गेली आहे.
पुढील २४ तासांपर्यंत थंडीची ही लाट कायम राहील. त्यानंतर तापमानात वाढ होईल, अशी माहिती आयएमडीचे मुंबईतील संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.