मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑटो रिक्षा संदर्भात आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या संदर्भात एक मेसेज पाठवला आहे. त्यात पुढील आदेश येई पर्यंत कोणतीही कारवाई करायची नाही असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या आग लावण्याच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीये.
आम्ही आग विझविणारे आहोत, असं ते म्हणालेत... राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी मनसे अध्यक्षांवर टीका केलीये.
विक्रोळीमध्ये फायर ब्रिगेडच्या कमांड सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं... त्यावेळी उद्धव यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.