महाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी

महाराष्ट्र सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे. 

Updated: Jun 2, 2015, 08:12 PM IST
महाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी  title=

मुंबई : महाराष्ट्र सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने १ जून २०१५ पासून खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. धूम्रपान करणे रोखाण्यापासून सरकारकडे कोणताही मार्ग नसल्याने अखेर सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात आयटीसीचा शेअर घसरला होता. 

आज दिवसभरात शेअरने ३१७ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. आयटीसीच्या विक्रीवर आता त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आयटीसीच्या सिगारेट विक्रीत महराष्ट्र राज्याचा ९ टक्के हिस्सा आहे. बंदीमुळे त्यात एक टक्का घट होण्याची शक्यता आहे. 

सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ हे केवळ आरोग्यासाठी घातक नसून त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कर्करोगाच्या रुग्णांत वाढ होत आहे. म्हणून तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.