www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहिहंडी उभारतांना चार ते चौदा वयोगटातील मुलांच्या सहभागावर बालहक्क आयोगानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा आदेश लवकरच जारी करण्यात येणार असून जे दहीहंडी मंडळं हा आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी खटले बालहक्क मंडळ दाखल करणार आहे.
दहिहंडी मंडळं दहिहंडी उत्सव साजरा करतांना बालकांचा गैरवापर करत असल्याची तक्रार पवन पाठक यांनी बालहक्क आयोगाकडे केली होती.
दहिहंडी उत्सवाचं व्यावसायिकरण झालं असल्याचीही तक्रार पाठक यांनी केली होती. बालहक्क आयोगानं याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करणारा अहवाल पोलिसांकडून मागवला होता.
दादर पोलिसांना अहवाल देण्यास आयोगानं सांगितलं होतं. यानुसार आज आयोगासमोर पोलिसांचा अहवाल सादर करण्यात आला.
या अहवालात 4 ते 1४ वर्षांच्या मुलांनी दहीहंडीचे थर रचण्यास बंदी घालावी तसंच शासनानं याबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याच्या सूचना अहवालात पोलिसांनी केली.
यानुसार आयोगानं बंदी घातली असून शासनाला योग्य मार्गदर्शक तत्व द्यावीत असे निर्देशही देण्यात येणारेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.