पोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ

वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी झाल्यात त्यांनी १ लाख १३ हजार मतांनी स्वप्नील पाटील यांना पराभव केला.. वांद्रे येथून तृप्ती सावंत या १९ हजार ८ मतांनी विजयी झाल्यात. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

Updated: Apr 15, 2015, 05:20 PM IST
पोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ title=

राणेंनी निवृत्ती घ्यावी - भाजप
या पराभवानंतर नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा, उपरोधिक सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय. तर महाजन यांनी आपल्याला शिकवू नये, असा राणेंनी पलटवार केलाय.

शिवसेनेच्या चपला आणि कोंबड्या
शिवसेनेनं आणि शिवसैनिकांनी आज जरा आगळं वेगळं सेलिब्रेशन केलं.... राणेंचा पराभव झाल्यामुळे अरविंद भोसलेंसाठी चपला आणल्या तर राणेंना कोंबड्या दाखवल्या, शिवसैनिक इतक्यावरच थांबले नाही तर नारायण राणेंच्या जुहूच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. 

'साहेबांचे काम सुरुच ठेवणार'
बाळा सावंत यांनी सुरू केलेलं काम आपण पुढं सुरू ठेवणार असल्याचं शिवसेनेच्या विजयी उमेदवार तृप्ती सावंत यांनी सांगितलंय.   

रत्नागिरीत जल्लोष
नारायण राणे यांचा पराभवाचे वृत्त कळताच रत्नागिरीतले तमाम शिवसैनिक रस्त्यावर उतरले. फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी राणेंविरोधात घोषणाबाजी केली. रत्नागिरीतील प्रत्येक चौकात फटाके आणि पेढे वाटून शिवसेनेनं आनंद साजरा केला. 

राजकीय सुरुंग
सिंधुदुर्गातल्या कुडाळ मतदारसंघातून राणेंचा यापूर्वीच पराभव झाला होता आणि आता वांद्रे पोटनिवडणूकीतही पराभव झाला. त्यामुळे राणेंच्या राजकीय कारकिर्दीला एक प्रकारे सुरुंगच लागलाय.

नागपूरमध्ये जल्लोष
राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला. आणि पार टोकाच्या नागपूरमध्येही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला. 

दुपारी १२ वाजता

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना पराभवाचा धक्का बसला असून शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी झाल्यात. एमआयएम तिसऱ्या स्थानावर फेकली गेली.  तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या जवळपास १ लाख १३ हजार मतांनी विजयी झाल्यात. त्यांनी भाजपचे बंडखोर स्वप्नील पाटील यांना पराभवाची धूळ चारली.

सकाळी ११.५० वाजता

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना निर्णयाक आघाडी घेता आलेली नाही. पहिल्या फेरीपासून ते पिछाडीवरच राहिले. मात्र, शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित असून राणेंचा पराभव अटळ असल्याचे दिसून आले आहे. तृप्ती सावंत यांचा १९ हजार ८ मतांनी विजय झाला. या विजयानंतर सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राणेंच्या घरासमोर फटाके फोडलेत. तर काहींनी कोंबड्या घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.

सकाळी ११.२० वाजता

राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील तथा आबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि आबांच्या पत्नी सुमन पाटील यांनी निर्णायक विजयी आघाडी घेत ११२९६३ मतांनी आपला विजय साकारला. आर आर यांच्यापेक्षा जास्त मते घेऊन त्यांचा गड अबाधित राखलाय.

सकाळी ११ वाजता

तेरावी फेरी, वांद्रे पूर्व
तृप्ती सावंत - ४०७२६
नारायण राणे - २३९५३
राजा रहेबरखान - ८९४१

सकाळी १०. ५५ वाजता

सतरावी फेरी, तासगाव- सांगली
सुमन पाटील - ११५६३६
स्वप्नील पाटील - १३६४३
सुमन पाटील १०१९९३ मतांनी आघाडीवर

सकाळी १०. ५० वाजता

अकरावी फेरी, वांद्रे पूर्व
तृप्ती सावंत - ३७५८२
नारायण राणे - १९८१२
राजा रहेबरखान - ५८६७ 
आठव्या फेरीनंतर तृप्ती  सावंत  १७७७० मतांनी आघाडीवर.

सकाळी १०. ४५ वाजता

नववी फेरी, वांद्रे पूर्व
तृप्ती सावंत - ३५८९६
नारायण राणे - १७६३६
राजा रहेबरखान - ४७३२ 

सकाळी १०. ४३ वाजता

पंधरावी फेरी, तासगाव- सांगली
सुमन पाटील - ११२९४९
स्वप्नील पाटील - ११८५६
सुमन पाटील ९१३९६ मतांनी आघाडीवर

सकाळी १०. ३० वाजता

चौदावी फेरी, तासगाव- सांगली
सुमन पाटील - ९६२२५
स्वप्नील पाटील - ११८५८
सुमन पाटील ८५०६७ मतांनी आघाडीवर

सकाळी १० .२० वाजता

तेरावी फेरी, तासगाव- सांगली
सुमन पाटील - ९०८६३
स्वप्नील पाटील - १०३७१
सुमन पाटील ८०५०२ मतांनी आघाडीवर

सकाळी १० . २०वाजता

नारायण राणे यांच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्त्यांची फटाकेंची आतषबाजी

सकाळी १० .१५वाजता

आठवी फेरी, वांद्रे पूर्व
तृप्ती सावंत - २६७९७
नारायण राणे - १३७४४
राजा रहेबरखान - ४२४० 
आठव्या फेरीनंतर तृप्ती  सावंत  १०६६७ मतानी आघाडीवर.

सकाळी १०.०५ वाजता

सातवी फेरी, वांद्रे पूर्व
तृप्ती सावंत - २२४८५
नारायण राणे - ११८२०
राजा रहेबरखान - ४०२१

सहाव्या फेरीनंतर तृप्ती  सावंत  १०६६७ मतानी आघाडीवर.

सकाळी १० वाजता

सहावी फेरी, वांद्रे पूर्व
तृप्ती सावंत - १८९३५
नारायण राणे - १०४४०
राजा रहेबरखान - ३६३५

सहाव्या फेरीनंतर तृप्ती  सावंत  ८४९५ मतानी आघाडीवर.

सकाळी ९.५८वाजता

अकावी फेरी, तासगाव- सांगली
सुमन पाटील - ७९०९२
स्वप्नील पाटील - ८३६७
सुमन पाटील ७०७२५ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.५१वाजता

दहावी फेरी, तासगाव- सांगली
सुमन पाटील - ७१०९५
स्वप्नील पाटील - ५८९५
सुमन पाटील ६३२०० मतांनी आघाडीवर

सकाळी ९.५०वाजता

पाचवी फेरी, वांद्रे
तृप्ती सावंत - १५०६८
नारायण राणे - ८९८१
राजा रहेबरखान - ३३६९

पाचव्या फेरी नंतर तृप्ती  सावंत  ६०८७ मतानी आघाडीवर.

सकाळी ९.४०वाजता

नववी फेरी - तासगाव, सांगली
सुमन पाटील - ६३९७२
स्वप्नील पाटील - ७०४८
सुमन पाटील या ५६९२४ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.३५ वाजता

वांद्रे - चौथी फेरी 
तृप्ती सावंत, शिवसेना - १०,३२६
नारायण राणे, काँग्रेस - ७२४६
राजा रहेबरखान, एमआयएम - ३१३१
तृप्ती  सावंत  ३०८० मतांनी आघाडीवर.

सकाळी ९.२५ वाजता

वांद्रे पूर्व - तिसरी फेरी

तृप्ती सावंत - ७५०४
नारायण राणे - ५४५३
एमआयएम - २२७०९
तिसरी  फेरीनंतर तृप्ती  सावंत  २०५१ मतानी आघाडीवर.

सकाळी ९.१५ वाजता

पाचवी फेरी
- सुमन पाटील -३५९४८
- स्वप्नील पाटील - ३३८०
- सुमन पाटील आघाडीवर ३२५६८

चौथी फेरी
मतानी आघाडीवर : २४०७१
- सुमन पाटील (NCP) : २६६८६७
- स्वप्नील पाटील :-२७९६८

तिसरी फेरी 
तासगाव, सांगली : पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या सुमन  पाटील   १६६४४ मतानी आघाडीवर 
- सुमनताई पाटील (NCP) : १८६३५
- स्वप्नील पाटील : १९९१

सकाळी ८.५० वाजता

वांद्रेमधून तृप्ती सावंत दुसऱ्या फेरीतही आघाडीवर

सावंत यांना ५९२६  राणे यांना २४३८ तर एमआयएम ४६६ मते

सकाळी ८.४५ वाजता

तासगावमधून सुमन पाटील दुसऱ्या फेरीतही आघाडीवर

सकाळी ८.४० वाजता

तासगाव : सुमन पाटील १६, ६४४ मतांनी आघाडीवर

सकाळी ८.३० वाजता

सुमन पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर

सकाळी ८.२०वाजता

वांद्रे : तृप्ती सावंत यांना २८२६ तर राणे यांना १५८१ मते, एमआयएम २९५ मते

सकाळी ८.१०वाजता

वांद्रे : काँग्रेसचे नारायण राणे पिछाडीवर, तृप्ती सावंत आघाडीवर तर एमआयएमचे राजा रहेबरखान तिसऱ्या क्रमांकावर

सकाळी ८.०५ वाजता

तासगाव : सुमन पाटील यांना ४१५० मते, तर स्वप्नील पाटील यांना ७५२ मते

सकाळी ८ वाजता

तासगाव : सुमन पाटील आघाडीवर

मुंबई :  वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील ४, १५० मतांनी आघाडी घेतली आहे. तर स्वप्नील पाटील यांना ७५० मते पडली आहेत. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

वांद्र्यामध्ये नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. तर MIMच्या कामगिरीकडेही लक्ष लागले आहे. 

तासगाव कवठे-महांकाळ मतदारसंघात सुमनताई पाटील यांना स्वप्नील पाटील यांचं आव्हान आहे. आर.आर. आबांचा बालेकिल्ला राष्ट्रवादी राखणार का याची उत्सुकता आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे पूर्व आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

दोन्ही ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वांद्यात काँग्रेसकडून माजी उद्योगमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे, शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि एमआयएमचे राजा रेहबार खान यांच्यात काँटे का मुकाबला आहे.. 
मातोश्रीच्या अंगणात होत असलेल्या या निवडणुकीला राणे विरुद्ध शिवसेना असा रंगही चढल्याचं पाहायला मिळालं.. तर एमआयएमनंही उमेदवार देत दोन्ही पक्षांना कडवं आव्हान दिलं.. त्यामुळं मातोश्रीच्या अंगणात कुणाची सरशी होणार याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात.. तर दुसरीकडे तासगावमध्ये माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यांना आव्हान दिलंय ते भाजप बंडखोर स्वप्निल पाटील आणि काही अपक्ष उमेदवारांनी.. त्यामुळं आबांचा वारसदार कोण होणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल...

वांद्रे पोटनिवडणुकीचा काय निकाल लागणार, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय.... हा निकाल राणे, काँग्रेस, शिवसेनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे. 

वांद्र्याचा निकाल नारायण राणेंसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे..... कोकणात राणेंचं साम्राज्य उध्वस्त झाल्यानंतर मुंबईतून राणे कमबॅक करणार का, याची उत्सुकता आहे... कोकणातला राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता मातोश्रीच्या अंगणात रंगलाय..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.