मुंबई : बँकेत नवीन खाते उघडण्यासाठीचे नियम रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शिथिल केले आहेत. त्यामुळे बॅंकेत खाते उघडण्याची कटकट दूर झाली आहे.
बॅंक खाते उघडण्यासाठी आता रहिवासी पुराव्यासाठी (अड्रेस प्रूफ) वीज, टेलिफोन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल दिले तरी चालणार आहे. फक्त आपले बिल दोन महिन्यांहून अधिक जुने नसावे.
तसेच बॅंक आणि पोस्ट ऑफिसचे अकाउंट स्टेटमेंट देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. मालमत्ता कर, नगरपालिका कर पावत्या देखील आता रहिवासी पुरावा म्हणून स्वीकारल्या जाणार आहेत.
बॅंकेत खाते उघडण्यासाठी पाइप गॅस किंवा पाणी बिलाचा पुरावा देखील ग्राह्य धरला जाईल. या शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन पावती (पेन्शन पेमेंट ऑर्डर) पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.