मुंबई : बेळगावचा लढा सुरूच राहील, मात्र नाट्य संमेलनाचा आखाडा करू नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
बेळगावात होत असलेलं हे संमेलन म्हणजे मराठी एकजूट दाखवण्याची संधी आहे. संमेलन नगरीला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलंय. त्यामुळे तिथं सर्व स्वाभिमानानं पण शिस्तीत घडावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
अखिल भारतीय नाट्य परिषद आणि निर्माता संघ यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. तसंच नाट्य परिषदेच्या गोंधळामुळे नाट्य कलाकारांची बदनामी होत असल्याचं मत व्यक्त करत, नाट्य परिषदेच्या एकूणच कारभारावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे.
नाट्य परिषदेच्या गोंधळी कारभारामुळे काही कलाकारांना बेळगाव नाट्य संमेलनाला जाता आलेलं नाही. तर मराठी बाणा फेम अशोक हांडे यांना आपला प्रयोग रद्द करावा लागलाय.
बेळगाव की बेळगावी हा वाद मिटल्यानंतर आता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या सकाळी नाट्यदिंडीनं संमेलनाला सुरूवात होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.