'युती'च्या चर्चेदरम्यान भाजपचा डबल गेम!

मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे भाजपने 227 वॉर्डांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करायला सुरूवात केलीय. 

Updated: Jan 17, 2017, 10:32 PM IST
'युती'च्या चर्चेदरम्यान भाजपचा डबल गेम! title=

मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे भाजपने 227 वॉर्डांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करायला सुरूवात केलीय. 

मुंबई भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीला मंगळवारपासून सुरूवात झाली. तीन दिवस ही बैठक चालणार आहे. 

भाजप शिवसेनामध्ये जागावाटपाबाबत चर्चा अपूर्ण असताना भाजपची मुंबईत सर्व जागांवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. 

राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा, असं सांगत भाजपाच्या 'पारदर्शी अजेंड्या'च्या मुद्द्यावर शिवसेनेनं पलटवार केलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला विरोधी पक्ष आणि पत्रकारांना आणून बसवा, अशी मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केलीय. नोटाबंदीचा निर्णय घेताना ही पारदर्शकता का बाळगली गेली नाही? असा सवालही त्यांनी केलाय.  

दरम्यान, युतीबाबत दुसरी बैठक बुधवारी दुपारी १ वाजता विनोद तावडेंच्या शासकीय निवासस्थानी होईल. आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पारदर्शी कारभाराबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव एकत्रित घेतील, असं समजतंय.