मुंबई : ग्रामविकास खात्याच्या निधीवरून भाजपच्याच मंत्र्यांमध्ये मानापमान दिसत आहेत. अधिकार सोडायला कोणीच तयार नसल्याचे पुढे आलेय.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ग्राम विकास खात्याच्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्यात हे मानापमान दिसून येत आहे. मुनगंटीवार आणि मुंडेंमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. अर्थमंत्र्यांना हवा असलेला अधिकार सोडण्यास मुंडे या राजी नाहीत.
अधिकारामुळे राज्यात ग्रामविकास विभागाचा 255 कोटींचा निधी रखडला आहे. सध्या हा निधी वाटपाचा अधिकार ग्रामविकास खात्याकडे आहे. पण आता हा अधिकार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हवा आहे. पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आपला अधिकार सोडायला तयार नाहीत. त्यामुळे भाजप मंत्र्यामधील वाद उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.