विधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 

Updated: Nov 11, 2014, 04:16 PM IST
विधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत  title=

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 

राष्ट्रवादीनं जर उमेदवार दिला तर त्याला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवली होती. राष्ट्रवादी भाजपच्या बागडेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ वाजेपर्यंत होती. मात्र शिवसेना सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे ही वेळ ३ वाजेपर्यंत वाढवण्यात आलीये.  

विधानसभेतली पहिलीच लढत शिवसेना विरुद्ध भाजप रंगणार आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांनीही पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तसंच पक्षातील आमदार आणि मित्रपक्षांनीही मला पाठिंब्या दिल्याचा विश्वास बागडेंनी व्यक्त केला आहे. 
 
दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या पूर्वसंध्येला रणनिती आखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावलीय. शिवसेनेच्या शिवालय या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.