www.24taas.com, मुंबई
मित्राच्या नव्हे... इथे ‘ती’ मैत्रिणींच्याच कृत्याला बळी पडली... ज्या मैत्रिणींवर विश्वास टाकला त्याच मैत्रिणींनी तिची अश्लिल ब्लू फिल्म काढून तिला ब्लॅकमेल केलं. मुंबईतल्या मीरा रोड परिसरात घडलेली ही खरीखुरी घटना नुकतीच उघडकीस आलीय.
मुंबईत मीरा रोड पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केलीय. आपल्याच मैत्रिणीची ब्लू फिल्म काढून या तिघी तिला ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. हुस्ना शेख, यास्मीन शेख उर्फ शबनम, माही शर्मा अशी अटक केलेल्या महिलांची नावं आहेत. पीडित महिला ही हुस्ना हिची मैत्रीण आहे. १४ फेब्रुवारीला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने या तिघींनी या पीडित युवतीला मीरा रोडच्या एका इमारतीत नेलं. तिथे जबरदस्तीने या तिघींनी तिला मारहाण करत, कपडे फाडत मोबाईलमध्ये तिचं शूट केलं. त्यानंतर ही व्हिडीओ क्लिप घरच्यांना दाखवू, अशी धमकी देत तिच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पीडित महिलेजवळ तेवढी रक्कम नसल्याने तिघींनी मिळून, तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतरही आरोपींनी तिला पैशांसाठी धमकी देण्यास सुरुवात केली.
या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी संबंधित तीन महिलांना नयानगर येथून अटक केली.