अर्जुन कपूरची जिम महापालिकेने तोडली....

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या जेव्हीपीडी येथील राहात्या घरी असलेली जिम महापालिकेने तोडली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2017, 11:03 PM IST
अर्जुन कपूरची जिम महापालिकेने तोडली....

 मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या जेव्हीपीडी येथील राहात्या घरी असलेली जिम महापालिकेने तोडली.

आज दिवसभर कारवाई सुरु होती. के पश्चिम विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली.

30 फूट बाय 16 चे अनधिकृत बांधकाम होते. 5 मार्च ला बजावली नोटीस होती. अर्जुन कपूरने स्वतः हून बांधकाम तोडण्याची तयारी दर्शवली होती, मात्र कुठलीही कार्यवाही त्याच्याकडून होत नसल्याने महापालिकेने कडक पाऊल उचलले आहे.

कारवाईचा खर्च महापालिका अर्जुन कपूर कडून वसूल करणार आहे.