मुंबई : मुंबईतील राजावाडी हॉस्पिटल मधून एका चार महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याची घटना घडली. मात्र घटना वेळीच लक्षात आली आणि आईन बाळाला पळवून नेणा-या महिलेचा पाठलाग करत आपल्या मुलाला ताब्यात घेतलं.
घाटकोपरच्या रमाबाई नगर येथे राहणाऱ्या शकुंतला कनोजिया यांच्या चार महिन्यांच्या बाळाला राजावाडी हॉस्पिटलमधून शबाना खातून महम्मद रफी खान या महिलेने पळवलं.
ही बाब लक्षात येताच शकुंतला यांनी शबानाच्या रिक्षाचा पाठलाग करत नागरिकांच्या मदतीनं आपल्या बाळाला ताब्यात घेतलं. शिवाजीनगर इथं राहणा-या आरोपी शबाना हिला टिळकनगर पोलिसांनी अटक केलीये. दरम्यान, या घटनेनं रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.