मध्य रेल्वे होणार सुपरफास्ट!

मुंबईकरांचा प्रवास जलद गतीने होणार आहे. कारण मध्य रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. 

Updated: May 9, 2015, 05:53 PM IST
मध्य रेल्वे होणार सुपरफास्ट! title=

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास जलद गतीने होणार आहे. कारण मध्य रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. 

मध्य रेल्वे मार्गावरील विद्युतप्रवाह डीसीतून एसीमध्ये परिवर्तित करण्याचं प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेला मिळालं आहे. २३ मे रोजी मध्यरात्रीपासून हे बदल अंमलात येतील. तसंच बम्बार्डीअर गाड्या मध्य रेल्वेवर धावण्याचा मार्गही मोकळा होईल.

या परिवर्तनाला प्रमाणपत्र देताना रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ७४ ठ‌िकाणांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाचा सवलत प्रमाणपत्रासाठी रेल्वे बोर्डाकडे अर्ज केला होता.

मध्य रेल्वेवर गेल्या वर्षी ठाण्यापर्यंतच्या विद्युतप्रवाहाचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर ठाणे ते सीएसटी या उर्वरित टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. यावर्षी जानेवारीत मध्य रेल्वेकडून डीसी-एसी परिवर्तनाची चाचणी झाली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.