भाजपच्या गळ्यातील आम्ही लोढणे आहोत का? : रामदास आठवले

भाजपचे घटकपक्ष नाराज असल्याचे दिसून आले आहे. आम्ही भाजपच्या गळ्यातील लोढणे आहोत का? विकास कामे होत नाहीत, याबाबत  मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. भाजपने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. तो त्यांनी दिलेला शब्द पाळावा, सत्तेत १० टक्के वाटा दिला पाहिजे, अशी थेट मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तर  भाजपने आम्हाला चांगली वागणून दिलेली नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Updated: May 9, 2015, 01:47 PM IST
भाजपच्या गळ्यातील आम्ही लोढणे आहोत का? : रामदास आठवले title=

मुंबई : भाजपचे घटकपक्ष नाराज असल्याचे दिसून आले आहे. आम्ही भाजपच्या गळ्यातील लोढणे आहोत का? विकास कामे होत नाहीत, याबाबत  मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. भाजपने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. तो त्यांनी दिलेला शब्द पाळावा, सत्तेत १० टक्के वाटा दिला पाहिजे, अशी थेट मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तर  भाजपने आम्हाला चांगली वागणून दिलेली नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

शेतकरी, दलित, आरक्षण आदी प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत. सरकार आले पण शब्द पूर्ण केला नाही. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलो नाहीत. सरकारचे घटक पक्ष म्हणून आम्हाला विचारात घ्यायला हवे होते. आता कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, यावर भाजप मित्रपक्षांचे एकमत झाले.
 
बैठक घेण्यामागे सरकारला विरोध करणे हा उद्देश नाही. सरकारला अडचणीत आणणे ही भूमिका नाही. पण सत्तेत सहभागी करून घेतले नाही म्हणून ही नाराजी आहे. भाजपने दिलेला शब्द पाळावा, ही प्रमुख मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणालेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. आम्ही ३ वाजता महायुतीचे अघटक पक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यावेळी बैठकीत ठराव केलाय. त्याबाबत १० टक्के सत्तेत सहभागाबाबत मागणी करणार आहोत. सत्तेत सहभग मिळत नसेल तर घटक पक्ष सत्तेत राहायचे की नाही याचा गांभीर्याने विचार करेल, असा थेट इशारा आठवले यांनी यावेळी दिला.

गोपीनाथ मुंडेसाहेब आज नाहीत , त्यांच्या आग्रहाखातर आम्ही महायुतीत आलो. ते नाहीत याची जाणीव घट पक्षाना आहे. आम्हाला लेखी आश्वसने दिली होती. पण आज कुणा बरोबर बोलायचे ते कळत नाही. ज्याना निर्णय घेण्याचे आधिकार आहेत, त्यांनी आता चर्चा करावी, यावेळी आठवले म्हणालते.

आम्ही लोढणे आहोत का, हे भाजपने स्पष्ट करावे. आमची काय आश्वासने पूर्ण केली हे भाजपने स्पष्ट करावे.  किती निधी दिला हे स्पष्ट करावे. सत्तेत आमचे नेमके स्थान काय आहे ? आमच्या जिल्या मध्ये विकास कामे झाली आहेत हे त्यांनी दाखवून द्यावे. घटक पक्षांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत. त्यामुळे नाराजी आहे. आमच्या मनात सरकारच्या कामाबाबत शंका आहे. आम्ही गडबड करणार नाही, पण जो निर्णय घ्यायचा एकटे घेणार आहोत, असे ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.