www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्रातही कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या य़ांनी केलाय. मंत्री, सनदी अधिकारी आणि माफीया यांच्यातल्या साटेलोट्यातून हा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
घोटाळ्याची व्याप्ती 10 हजार कोटींची आहे असं त्यांनी म्हटलंय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजेंद्र दर्डा आणि विजय दर्डा यांच्यासह ए. रामकृष्णन. व्ही. के. जयरथ, आणि व्ही. के. सावरखांडे हे अधिकारी यांचा यात सहभाग असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी अनेक वेळा आघाडीतील नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. अनेक घोटाळे स्वतः सोमय्यांनी उघड केले आहेत. आता सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस काय उत्तर देईल, हे पाहाणं महत्वाचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.