निफाड, अहमदनगरचा पारा सर्वात खाली

पुण्यामध्ये आज पहाटे 8.9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.

Updated: Dec 12, 2016, 10:54 PM IST
निफाड, अहमदनगरचा पारा सर्वात खाली

मुंबई : गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरलेली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळ नंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळतेय. पुण्यामध्ये आज पहाटे 8.9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.

रविवारी पुण्याचे तापमान 8.3 अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील एक दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तिकडे नाशिक, निफाडमध्ये  थंडीचा कडाका कायम आहे. आज पहाटे निफाडचं तापमान 7.6 अंश नोंदवण्यात आलं.  

तिकडे  नगर आणि महाबळेश्वरमध्येही पारा  अनुक्रमे 7.8 आणि 7.2 अंशांवर पोहचलाय.   त्याचवेळी राज्यात वातावरण ढगाळ होण्यास सुरूवात झालीय. पुढील दोन दिवसात पुणे आणि परिसरात तापमानात वाढ अपेक्षीत आहे. दरम्य़ान 14 आणी 15 डिसेंबर रोजी पुणे आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x