आता, कागदी नाही ‘ई-फाईल’शोधा!

मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्र सरकारची लाजच काढली. या आगीत अनेक कागदी फाईली जळून भस्मसात झाल्या. या घटनेतून धडा घेत आता राज्यातील सर्व महापालिका, महामंडळं आणि प्राधिकरणांना‘पेपरलेस’होत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 17, 2012, 08:10 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्र सरकारची लाजच काढली. या आगीत अनेक कागदी फाईली जळून भस्मसात झाल्या. या घटनेतून धडा घेत आता राज्यातील सर्व महापालिका, महामंडळं आणि प्राधिकरणांना‘पेपरलेस’होत आहेत. या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आता ‘ई-प्रणाली’रुजू होतेय. त्यामुळे गांधी जयंतीपासून आता अधिकाऱ्यांना ‘फाईल सापडत नाही’हे कारण देता येणार नाही.
मंत्रालयाच्या आगीत महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्याने राज्य सरकारनं या आगीचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे शासनाने ६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका, महामंडळे, प्राधिकरणांना पेपरलेस ई-ऑफिसप्रणालीचा वापर करण्याचे फर्मान सोडलं. त्यामुळे लवकरच मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांचाही कारभार पेपरलेस होणार आहे. त्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्व कागदपत्रांचं डिजिटिलायझेशन करण्यात येणार आहे. ‘ई-प्रणाली’अंमलात आणण्यासाठी शासनानं गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरचा मुहूर्त साधलाय.