सभेच्या जागेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद

 महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2017, 06:08 PM IST
सभेच्या जागेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद title=

मुंबई : महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय.आधी वांद्रे-कुर्ला संकुलातल्या मैदानावरून शिवसेना-भाजपामध्ये जुंपली होती. तिथं भाजपानं माघार घेत शिवसेनेचा मार्ग मोकळा केला. 

मात्र शिवसेनेनं 18 तारखेसाठी दादरच्या गोखले रोडवरच्या दत्ता राऊळ मैदानही आरक्षित केलंय... हेच मैदान मनसेला राज ठाकरे यांच्या शेवटच्या सभेसाठी हवंय. शिवसेनेची सभा वांद्रे कुर्ला संकुलात होत असल्यामुळे त्यांनी राऊळ मैदानावरचा हक्क सोडावा, अशी मनसेची मागणी आहे.

 मात्र ही मागणी शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळे आता प्रभादेवीला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' प्रेसच्या बाहेर जंगी सभा घेऊन आव्हान देण्याची तयारी मनसेनं सुरु केली आहे.